सैफ आणि नवाजुद्दीनचा वधारला भाव; सेक्रेड गेम्स-2 साठी वाढलं मानधन

By  
on  

कभी कभी लगता है अपुनहीच भगवान है ! असं म्हणणारा, नवाजुद्दीन सिध्दीकी भाव खाऊन गेला खरा. पण आता सेक्रेड गेम्सच्या जबरदस्त यशानंतर त्याच्या मानधनात सुध्दा वाढ होणार आहे. सेक्रेड गेम्स या वेबसिरीजने फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळवलीय. म्हणूनच निर्मात्यांनीसुध्दा दुप्पट बजेट आखणी त्यांच्या दुस-या सीझनसाठी ठेवलीय.

सेक्रेड गेम्स ही आत्तापर्यंतची सर्वात बिग बजेट वेबसिरीज आहे. त्यामुळे एकूणच दुसरा सीझन मोठ्या ग्रॅण्ड लेव्हलवर होणार, याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो.सर्वांनाच आता या दुस-या सीझनची प्रचंड आतुरता लागून राहिली आहे, कारण 25 दिवसांचं चक्र अजून पूर्ण झालेलं नाही. सेक्रेड गेम्सच्या या यशामुळे या वेबसिरीजचे दोन मुख्य कलाकार सैफ अली खान आणि गणेश गायतोंडे म्हणजेच अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकी यांच्यासाठी एक खुशखबर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,  दुस-या सीझनसाठी या दोघांच्याही मानधनात घसघशीत वाढ करण्यात येणार आहे.

सेक्रेड गेम्स 2 ची घोषणा तर झालीय आता लवकरच त्याचं शूटींगही पूर्ण करण्यात येईल. तोपर्यंत मात्र चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.

Recommended

Share