By  
on  

पाहा Trailer : सुव्रत जोशी 'जॉबलेस' का होतो? या वेबसिरीजमधून मिळणार उत्तर

सारं काही सुरळीत सुरु असताना अचानक तुमचा जॉब गेला तर? बिझनेस ठप्प झाला तर? अशा वेळी संपूर्ण आयुष्याचे गणितच बिघडून जाते. माणसाची मानसिक स्थिती ढासळू लागते आणि पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा चुकीचा निर्णयही घेतला जातो. या एका चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, ही दाखवणारी वेबसिरीज म्हणजे 'जॉबलेस' ही सिरीज. 

या सिरीजमध्ये अभिनेता सुव्रत जोशी, पुष्कर श्रोत्री प्रमुख भूमिकेत असून निरंजन पत्की यांनी दिग्दर्शन केलय. नुकताच या सिरीजचा ट्रेलर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला असून महामारीच्या कठीण काळात सुव्रत 'जॉबलेस' का होतो? पैसे मिळवण्यासाठी तो वाईट मार्गाचा अवलंब करतो का? या अडचणीतून तो बाहेर येतो का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न 'जॉबलेस'मधून उलगडणार आहेत. 

नोकरी गेल्याने अनेक जण तणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते. एक चूक सावरताना हातून अनेक चुका होतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कठीण परिस्थितीवर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे.  येत्या 31 ऑगस्टपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी' वर ही वेबसिरीज पाहायला मिळणार आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive