बोल्ड कथानक असलेल्या 'काळे धंदे' वेबसीरिजचा टीजर पाहिलात का?

By  
on  

सध्या वेबसिरीजच्या माध्यमातून मनोरंजनाचा उत्तम प्लॅटफॉर्म रसिकांसमोर आला आहे. आता आणखी एक वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘काळे धंदे’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. या वेबसीरिजचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीजरमध्ये प्रत्येकजण एकमेकांना शिव्या देताना दिसत आहे. या टीजरमधून 'काळे धंदे'चं कथानक उलगडलं नसलं तरी एक हटके विषय असल्याचा पाहायला मिळत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tumchehi... Aamchehi... Kaale Dhande! #KaaleDhande #24thSeptember

A post shared by SanSKRuti BaLguDE (@sanskruti_balgude_official) on

शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे दोघांनी कोणते काळे धंदे केले आहेत आणि महेश मांजरेकर त्यांचा कसा पर्दाफाश करणार हे पाहायला प्रेक्षकांना मज्जा येणार हे नक्की! या तिघांसह अभिनेता निखिल रत्नपारखी सुद्धा विशेष भूमिकेत झळकणार आहे. ‘होणार भल्याभल्यांचे वांदे, जेव्हा उघड होणार लपवलेले ‘काळे धंदे’! नवीकोरी करकरित सिरीज ’ झी 5ची ही वेबसिरीज 24 सप्टेंबरला झी 5वर रिलीज होत आहे.

 

Recommended

Loading...
Share