By  
on  

रियल लाईफ आई-मुलाचं नातं असलेले मृणाल कुलकर्णी-विराजस 'आईची जय' शाॅर्टफिल्ममध्ये एकत्र

मराठी-हिंदी इंडस्ट्रीतले अनेक कलाकार डिजीटल माध्यमात कार्यरत आहेत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सुद्धा आता एका शाॅर्टफिल्मच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'आईची जय' हे या शाॅर्टफिल्मचं असुन या शाॅर्टफिल्मचं वैशिष्ट्य असं की यामध्ये रियल लाईफमध्ये आई-मुलाचं नातं असलेले मृणाला कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा विराजस या शाॅर्टफिल्ममध्ये आई-मुलाच्या भुमिकेत आहेत. 

करियर आणि पुढील शिक्षणासाठी पुण्यात राहणारा एक मुलगा(विराजस कुलकर्णी) मुंबईला जाण्याचा प्लॅन करतो. परंतु त्याची आई(मृणाल कुलकर्णी) प्रेमाखातर मुलाला पुण्यात राहुनच पुढील गोष्टी करण्यास सांगते. परंतु मुलगा आपल्या निर्णयावर ठाम असतो. त्यावेळी आई-मुलामध्ये थोडे मतभेद होतात. त्यानंतर पुढे मुलाला आईची बाजु कळते का? तो मुंबईला जातो का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ही 'आईची जय' ही शाॅर्टफिल्म पाहुन मिळतील. 

गौरव पत्की यांनी 'आईची जय' शाॅर्टफिल्मच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ख-या आयुष्यात आई मुलाचं नातं असल्याने मृणाल कुलकर्णी-विराजस यांचं या शाॅर्टफिल्ममधलं आई-मुलाचं नातं आणखी छान फुललं आहे. मृणाल कुलकर्णी नेहमीच्या सहजतेने आईची भुमिका साकारली आहे. विराजसने सुद्धा करियर आणि कुटूंब यांमध्ये तगमग होत असलेल्या मुलाची मनस्थिती अचुकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. 

गौरव पत्की लिखित-दिग्दर्शित 'आईची जय' ही शाॅर्टफिल्म युट्युबवर प्रेक्षकांना पाहता येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive