डिजीटल पदार्पणासाठी सज्ज झालीय सुष्मिता सेन, या दिवशी भेटीला येतेय वेबसिरीज

By  
on  

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा लव लाईफचीच जास्त चर्चा होताना पाहायला मिळते, पण लवकरच सुष्मिता करिअरच्या सेकंड इनिंगची सुरुवात करतेय.

सुष्मिता सेन लवकरच आपल्या डिजीटल पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. 'आर्या' या शोमधून ती रसिकांच्या भेटीला येत आहे. राम माधवानी या वेब शोचं दिग्दर्शन करतायत. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये याच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. राजस्थानच्या पार्श्वभूमीवर याची कथा उलगडण्यात येत असून सुष्मिता यात प्रमुख भूमिका साकारतेय. 

सुष्मिता शेवटची अनीस बाज्मीच्या नो प्रॉब्लेम सिनेमात झळकली होती. तर 2015 मध्ये बंगाली फिल्ममेकर श्रीजीत मुखर्जीच्या ‘निर्बाक’मध्ये दिसली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Romancing #balayage #sunkissed ️ Don’t look I am changing#sharing #newlook I love you guys!!!

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

सुष्मिताला ब-याच कालावधीनंतर पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले असून येत्या 29 मार्च रोजी हा वेब शो हॉटस्टार वरुन प्रदर्शित होईल. 
 

Recommended

Loading...
Share