By  
on  

‘Betaal’ Review : जिंतेद्र जोशी आणि इतर कलाकारांचा दमदार अभिनय आणि कहाणीचा थरार 

वेब सिरीज – बेताल

ओटीटी – नेटफ्लिक्स

कलाकार – विनीत कुमार, अहाना कुमरा, सुचित्रा पिल्लाई, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ मेनन, मंजिरी पुपाला

दिग्दर्शक – पॅट्रीक ग्रहम, निखिल महाजन

रेटिंग – 3.5 मून्स

प्रत्येक भारतीयाने त्याच्या लहानपणी राजा विक्रम आणि पिशाच्च वेताळ यांची कहाणी ऐकली असेल. आणि अशाच एका कहाणीवरून ब्लमहाऊस टेलिव्हीजन, एस के ग्लोबल एन्टरटेन्मेंट आणि किंग खान शाहरुखच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट यांनी नव्या काळातील प्रेक्षकांसाठी कहाणी घेऊन बेताल ही वेब सिरीज आणली आहे. या वेब सिरीजमध्ये विनीत कुमार, अहाना कुमरा, सचित्रा पिल्लाई आणि जितेंद्र जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  फक्त चार भागांची ही वेब सिरीज आहे. 
ही कहाणी एका गावातली आहे, जिथे आदिवासी राहतात. तिथे इंग्रजांच्या काळातला एक ब्रिज आहे. या ब्रिजला तोडून हायवे बनवण्यात येणार आहे. मात्र या ब्रिजच्या मागे आहेत एक नकारात्मक शक्ती. बेताल पहाड टनल असं या जागेचं नाव आहे. आणि म्हणूनच राज्याचे अधिकारी एका टीमला हायवेचं बांधकाम करण्यासाठी नेमतात ज्याने या गावाचा संपर्क शहराशी होईल.
अजय मुधळवान जो साकारला आहे अभिनेता जितेंद्र जोशीने तो या सगळ्या प्रक्रियेचं निरीक्षण करत असतो.   मात्र या सगळ्यात मुधळवान सीआयपीडी (काउंटर इनसरर्जंसी पोलिस डिपार्टमेंट) सहाय्यासाठी बोलवतो. आणि या टीममध्ये असतात त्यागी (सुचित्रा), विक्रम सिरोही ( विनीत), डी सी अहलुवालिया (अहाना), अस्सद अकबर (जतीन गोस्वामी), नादीर हक (सिध्दार्थ मेनन)गावकरी या बेतालला शांत ठेवून आहेत. हा बेताल दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे ब्रिटीश सेनेचा एक इंग्रज ऑफिसर आणि त्याच्यासोबत त्याची सेना आहे. मात्र या ठिकाणी सुरु झालेल्या या विकास कामात बटालियन बोलावून गावकऱ्यांना आणि तेथील आदिवासांनी हटवलं जातं. जेणेकरून तिथे असलेली गुफा तोडता येईल. मात्र यातच बेताल आझाद होतो. आणि सिआयपीडीची टीम या बेतालच्या आर्मीचा टार्गेट बनतात. मात्र ही सोल्जर्स या बोतालच्या टीमला संपवतात का ? या युध्दाचा थरार कसा आहे ? त्यात कुणाचा मृत्यू होता ? आणि हे सगळं कुणामुळे घडतं हे या सिरीजमध्ये पाहायला मिळतय.
दिग्दर्शक पॅट्रीक ग्रहम आणि सह दिग्दर्शक निखील महाजन यांनी ही कथा आकर्षक पद्धतिने मांडली आहे. ही चार भागांची मिनी सिरीज प्रभावीत करणारी आणि हटके आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या विविध झॉम्बी हॉररमध्ये ही सिरीज मोडत असली तरी याच्या कहाणीमुळे आणि सादरीकरणामुळे ही वेगळी ठरते.लेखनाच्या दृष्टीनेही या सिरीजमध्ये बाजी मारली आहे. पॅट्रीक आणि सुहानी कनवार यांनी याचं लेखन केलं आहे. गुढ कायम ठेवण्याचं उत्तम लिखाण यात आहे. एवढच नाही तर सिरीजमधील प्रत्येक भूमिका उत्तम पद्धतिने रेखाटली गेली आहे. 

अभिनेता विनीत कुमारने साकारलेला सिरोही हा या सिरीजचा हिरो आहे. त्याच्या भूमिकेतून तो प्रभावीत करतो. अभिनेत्री अहाना कुमराने डिसी अहलुवालियाच्या भूमिकेतही उत्तम काम केलं आहे. तिच्या भूमिकेच्या विविध सरप्राईज करणाऱ्या बाजू या सिरीजमध्ये पाहायला मिळतील. सुचित्रा पिल्लाई ही देखील यात सरप्राईज पॅकेज म्हणून पाहायला मिळेल. तिच्या डोळ्यातून केलेला अभिनय अंगावर काटा आणणारा आहे.   
जितेंद जोशीने साकारलेला लालची अजय मुधलवान, रिचर्ड, सायना, मंजिरी पुपाळा या सगळ्यांनी त्यांच्या भूमिकेला चांगला न्याय दिलाय. सिध्दार्थ मेनन आणि जतीन गोस्वामी यांच्या छोट्या भूमिका असल्या तरी त्यातूनही त्यांनी प्रभावी कामं केली आहेत.

अभिनेता जितेंद्र जोशी या सिरीजमध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे. या सिरीजमधील त्याच्या भूमिकेची लांबी ही सेक्रेड गेम्स सिरीजपेक्षाही जास्त आहे. या सिरीजमधील जितेंद्रचा महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे. नेहमीच अभिनयाच्या बाबतीत बाजी मारणारा जितेंद्र यातही प्रभावीत करतो. कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारा अधिकारी तो या सिरीजमध्ये साकारतोय.अभिनेता सिध्दार्थ मेननच्या भूमिकेची लांबी यात कमी असली तरी त्या भूमिकेतही त्यांनी उत्तम काम केलं आहे. तो सोल्जर बटानियनचा एक भाग दाखवला आहे. सिध्दार्थसाठी ही सिरीज बिग ब्रेक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्या भूमिकेतील एक महत्त्वाचा ट्विस्टही यात पाहायला मिळेल.

 

सिरीजची तांत्रीक बाजू पाहिली तर छायांकन केलं आहे तनय साटम यांनी. त्यांचं शार्प कॅमेरा वर्क पाहायला मिळतय. काही थरारक दृश्ये त्यांनी उत्तम टीपली आहेत. साउंड डिझायनर अनीर्बन सेनगुप्ता यांनी महत्त्वाची धुरा सांभाळली आहे. एडिटर अभिजीत देशपांडेच्या कामाचेही इथे विशेष कौतुक. प्रोडक्शन डिझायनर गरीमा माथुर, क़ॉश्यूम डिझायनर श्रुती कपूर आणि मेकअप आर्टीस्ट या सगळ्यांचीच मेहनत यात दिसून येत आहे. 
बेताल हा कायम लक्षात राहणारा अनुभव आहे. आणि तो तुम्ही एकदा नक्की घ्या. हा थरारक अनुभव तुमचं नक्कीच मनोरंजन करेल.

Recommended

PeepingMoon Exclusive