By  
on  

Video : गश्मीर म्हणतोय, 'मेरी लाईफ का एक ही फंडा है' , जाणून घ्या

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या कोणी वेबसिरीजचा आनंद लुटत नसेल असं कोणी सापडणारच नाही. उलट मनोरंजनासाठी आता वेबसिरीजचाच काय तो आधार उरला आहे. अशातच मराठीतला डॅशिंग आणि हॅण्डसम हंक गश्मिर महाजनी स्टारर नवी कोरी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

सोनी लिव्हवर ही वेबसिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अद्याप फक्त याचा टीझर रिलीज झाला आहे. तो पाहता एक्शन-थ्रीलर असलेली ही हिंदी वेबसिरीज आहे. एसओटी- सर्जिकल ऑपरेशन टीम  असं तिचं नाव असून चाहत्यांमध्ये याची उत्सुकता आहे. गश्मिरला या नव्या प्लॅटफॉर्मवर डॅशिंग अंदाजात पाहायला कोणाला नाही आवडणार. त्याचे यातील असे संवाद आहेत, मेरी लाईफ का एक ही फंडा है... नो रुल्स, नो कमिटमेंट्स ..ऑन्ली एड्जस्टमेंट .

चाहत्यांनी त्याच्या या टिझरला भरभरुन प्रतिसाद दिला असून सर्वचजण या वेबसिरीजच्या प्रदर्शनाची वाट पाहतायत. गश्मिरला या नव्या प्लॅटफॉर्मसाठी पिपींगमून मराठीतर्फे खुप खुप शुभेच्छा 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive