By  
on  

 EXCLUSIVE : “शिवानी आणि माझी केमिस्ट्री आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कुठेही वापरता येते”, 'इडियट बॉक्स' सिरीजमधील अभिनेता शिवराजने शेयर केला अनुभव

‘इडियट बॉक्स’ ही नवी मराठी वेब सिरीज येत्या 24 जुलै रोजी एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित होत आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. अभिनेता शिवराज वायचळ आणि शिवानी रांगोळे या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.  जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, अक्षय टांकसाळे, प्रविण तरडे, सुनील बर्वे, मृणाल कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी, संस्कृती बालगुडे, पुष्कर जोग हे कलाकारही या सिरीजमध्ये पाहायला मिळतील. 
या सिरीजमधील मुख्य अभिनेता शिवराजने नुकतच पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्याने शिवानी रांगोळेसोबतच्या केमेस्ट्रीविषयी सांगीतलं. तो म्हणतो की, “दरवेळी आम्ही एकत्र झळकलो तेव्हा कधी कपल तर कधी वेगळं, तर वेगवेगळ्या रिलेशनमध्ये शिवानी आणि मी काम केलेलं आहे.  आम्ही नाटकांमध्येही एकत्र काम केलेलं आहे. आमची मैत्री फुलत गेली आणि त्यामुळे त्याचा फायदा कधीही काम करताना होतो, जरी आई मुलाचा रोल असेल तरी आम्हाला माहिती आहे की केमिस्ट्रीचा प्रॉब्लेम आम्हाला कधी आला नाही. किंवा विराजस असेल या वेबसिरीजमध्ये काम करणारे काही कलाकार असतील त्यांची कामं पाहिलीत आणि एकत्र कामं केलीत तर ती केमिस्ट्री आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कुठेही वापरता येते. शिवानी आणि मी या सिरीजमध्ये मित्र आहोत. जसं खऱ्या आयुष्यात मित्र आहोत तसे यात आहोत.”

या सिरीजचे दिग्दर्शक विराजस आणि जीतसोबतही शिवराजने याआधी काम केलेलं आहे. त्याविषयी त्यांनी सांगीतलं की, “विराजस आणि जीत यांनी ही सिरीज दिग्दर्शित केली आहे. दोघांबरोबर काम केलेलं असल्यामुळे दोघांनाही माहिती आहे की मी कशाप्रकारे काम करू शकतो. आणि मला ही माहिती असतं की त्यांना काय अपेक्षित आहे. देवाणघेवाण सतत होत असल्याने विविध पद्धतिने आम्ही शुट करू शकलो.”
शिवराज या वेबसिरीजचा भाग कसा झाला ? याविषयी सांगताना त्याने गोष्ट ऐकण्याआधी कास्टिंग झाल्याचं सांगीतलं. तो म्हणतो की, “थिएट्रॉन च्या ग्रुपची इच्छा होती वेब सिरीज करायची. विराजस एक दिवशी आला माझ्याकडे म्हटला माझ्याकडे एक विषय आहे. तेव्हा गोष्टही ऐकली नव्हती पण कास्टिंग झालं होतं. जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा लक्षात आलं की यावर छान प्रयोग करता येणार आहे.”

याशिवाय शिवराजला चित्रकलेची आवड आहे तो फाईन आर्टिस्टही आहे. लॉकडाउनच्या काळात तो ही आवडही जोपासतोय. लॉकडाउनमध्ये तो या गोष्टी करत असल्याचे त्याने सांगितलं. “मी स्केचिंग करतचं असतो. जेव्हा निवांत वेळ असतो तेव्हा करतो. ते कधी सुटलेलं नाही आणि सुटणारही नाही. लॉकडाउनच्या काळतही घरी आईलाही मदत करतोय.”

Recommended

PeepingMoon Exclusive