‘इडियट बॉक्स’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता शिवराज वायचळ मुख्य भूमिकेत आहेत.पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शिवानीने या सिरीजचा अभिनेत्री आणि निर्माती असल्याचा अनुभव शेयर केला आहे. ती म्हणते की, “इडियट बॉक्स स्पेशल असण्याचं कारण हेही आहे की यामध्ये मी पहिल्यांदा प्रोड्युसर म्हणून काम केलय. यात मी अगदी ग्राउंड लेव्हल पासून काम केलय. माझ्यासाठी त्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आणि जवळचा प्रोजेक्ट आहे.”
तिच्या सहकलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयीही शिवानी सांगते. आत्तापर्यंत सहकलाकार आणि मित्र शिवराजसोबत अनेक वेळा काम केलं असल्याने त्याचा फायदा कसा झाला ते ती सांगते. “या सिरीजच्या प्रक्रियेत सुरुवातीपासून सहभागी असल्यामुळे ते कॅरेक्टर माहित होतं. सेटवरील पहिला दिवस पहिला दिवस वाटलाच नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्र खूप काही काम केलं असल्याने एकमेकांच्या टायमिंगचाही अंदाज आला होता. आम्ही सगळ्यांनी खूप चोख प्लॅनिंग केलं होतं. विराजस आणि जीतने असं प्लॅनिंग केलं होतं की शिस्तबद्ध असं चित्रीकरण झालं. मजा सुद्धा केली आम्ही पण त्याचबरोबर आमच्यासाठी खूप शिकण्यासारखं होतं.” येत्या 24 जुलै रोजी एम एक्स प्लेयरवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे.
या शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत शिवानी रमाबाई साकारतेय. याविषयी मिळणाऱ्या प्रतिक्रियेविषयीही शिवानी सांगते. “रमाबाईंचं कॅरेक्टर करत होते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटलं होतं की मी रमाबाईंचं कॅरेक्टर करतेय. कारण आधी असं काहीच केलं नव्हत. तिथून ते लोकांनी आता रमाई म्हणणं हा इतका छान रिस्पॉन्स आहे. आणि माझ्यासाठी हे कायम लक्षात राहणारं कॅरेक्टर आहे.”