By  
on  

Idiot Box Review : एक लव्ह स्टोरी आणि पाच जॉनर असलेली वेब सिरीज ‘इडियट बॉक्स’ आहे मनोरंजनाची पर्वणी

सिरीज – इडियट बॉक्स
दिग्दर्शक – विराजस कुलकर्णी, जीत अशोक
लेखक – विराजस कुलकर्णी
कलाकार – शिवानी रांगोळे, शिवराज वायचळ, स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, अक्षय टांकसाळे, प्रविण तरडे, मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे, अक्षय कुलकर्णी

ओटीटी  - एम एक्स प्लेयर
रेटिंग - 3 मून

आपल्या घरात असलेल्या टेलिव्हीजनवर चॅनेल बदलत असताना विविध चॅनेल आणि जॉनर आपल्याला पाहायला मिळतात. तशीच आहे एम एक्स प्लेयरवर नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सिरीज ‘इडियट बॉक्स’ ज्याच्या पाच भागांमध्ये तुम्हाला सगळ्या चॅनेलची मजा लुटता येईल. फक्त एवढच नाही तर एका वेब सिरीजमध्ये एक चकचकीत मसालेदार सिनेमा पाहील्याचा फिलही देऊ शकतो. एम एक्स प्लेयरवर नुकतीच ‘इडियट बॉक्स’ ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. गणराज असोसिएट्स प्रस्तुत आणि थिएट्रॉनची निर्मिती असलेली ही वेब सिरीज आहे. जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. विराजसने ही सिरीज लिहीली आहे. अभिनेता शिवराज वायचळ आणि शिवानी रांगोळे या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.


आकाश (शिवराज वायचळी) नावाचा मुलगा   ज्याला त्याची गर्लफ्रेंड शाश्वती (संस्कृती बालगुडे)   पुन्हा मिळवायची आहे. गर्लफ्रेंडसोबत नेमकं ब्रेकअप झालं नसल्याची जाणीव त्याला होते तेव्हा तिला भेटण्यासाठीचा शोध सुरु होतो. यात त्याला त्याचा मित्र (अक्षय कुलकर्णी) मदतील येतो. मात्र यातच मित्राच्या पायाला दुखापत झाल्याने आकाशची मैत्रीण सायली (शिवानी रांगोळे) त्याला मदत करते. इथूनच या रंजक प्रवासाला सुरुवात होते.या सिरीजचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की सिरीजच्या प्रत्येक भागात एक वेगळा ज़ॉनर पाहायला मिळतो. त्यामुळे पुढे जाणारी कथा रंजक आणि एन्टरटेनिंग वाटू लागते. कधी चोरी, रिएलिटी शो, साऊथ एक्शन, रोमान्स, कॉमेडी, डान्स या सगळ्या गोष्टी यात पाहायला मिळतात. प्रत्येक भागात काही स्टार कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात आणि ते पाहायला मजा येते. 


सिरीजमधली गाणी मात्र वेळ खावू वाटतात. तरीही हा प्रवास सुखकर करते ती शिवराज आणि शिवानीची केमिस्ट्री. दोघांची केमिस्ट्री उत्तम जुळलीय आणि ती यात दिसते. दोघांनी याआधीही एकत्र काम केलं असलं तरीही या कथेतली त्यांची जोडी फ्रेश वाटते. शिवराज आणि शिवानीने पाचही भागांच्या जॉनरमध्ये स्वत:ला झोकून दिलय. ते त्यांच्या अभिनयातून जाणवतं.जीतसोबत विराजसने सहदिग्दर्शकाची आणि लेखनाची बाजू उत्तम सांभाळली आहे. म्युझीकही चांगलं वाटतयं. तर सिनेमॅटोग्राफीने  सिरीजची शोभा आणखी वाढवली आहे. स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, अक्षय टांकसाळे, प्रविण तरडे, मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे या कलाकारांचे कॅमियो लक्षवेधी आहेत. या कलाकारांच्या हटके भूमिका सरप्राईज करतात. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा कॅमियो तुम्हाला सोनपरीची आठवण करून देतो.

प्रत्येक वळणावर आपला मित्र आकाशला मदत करणारी मैत्रीण सायली आणि त्यांच्या प्लॅनमध्ये येणाऱ्या अडचणी आणि उद्गारवाचक चिन्हामुळे झालेला गोंधळ आणि गुंता कसा आणि कधी सुटतो हे सगळं पाहणं रंजक आहे. ‘इडियट बॉक्स’ या सिरीजची कथा सुरुवातीपासून शेवटच्या भागापर्यंत उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकणारी आहे.. त्यामुळे एकाच सिरीजमध्ये विविध चॅनेलचा जॉनर आणि ती मजा अनुभवायची असेल तर ही सिरीज नक्की पाहा.
 

Recommended

PeepingMoon Exclusive