By  
on  

'बॉइज 2' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हटलं की, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लिओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला...' या सनीच्या रिमिक्स लावणीने बॉईजला चांगलीच प्रसिध्दी मिळून दिली होती. त्यामुळे 'बॉईज 2' मध्ये आयटम सॉंग नसेल तर नवलच !

अवधूत गुप्तेंचे भन्नाट संगीत दिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'तोडफोड' हे आयटम सॉंग तरुणांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे. 'बॉईज 2' चा संवाद लेखक ऋषिकेश कोळीने शब्दबध्द केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे, गणेश चंदनशिव आणि प्रसेनजीत कोसंबीचा आवाज लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात प्रसिध्द अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचा हटके अंदाज आपल्याला पाहता येणार आहे. वाढदिवसावर आधारित असलेल्या या 'तोडफोड' आयटम सॉंगमध्ये सुवर्णा काळेचा आयटम नंबर आपल्याला पाहायला मिळतो. उडत्या चालीचे हे गाणे तरुणाईला आपल्या तालावर थिरकवण्यास जबरदस्त यशस्वी ठरत आहे.

शाळेतून कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड या कलाकारंची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या निर्मातीची धुरा लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे, इरॉस इंटरनॅशनलद्वारे 'बॉईज 2' सिनेमाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे.

https://youtu.be/QKmGfHjyQRU

येत्या 5 ऑक्टोबर रोजी 'बॉईज 2' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive