By  
on  

या कलाकाराला येत आहे राणादाची आठवण, पाहा फोटो

लॉकडाउनच्या काळात घरात बसलेले मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या चित्रीकरणाचे दिवस आठवत आहेत. काहींना सेटची, सहकलाकारांची, शुटिंगची प्रचंड आठवण येत आहे. कला विश्वातील चित्रीकरण हळूहळू सुरु होत असताना ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं चित्रीकरणही लवकरच सुरु होत आहे.
या मालिकेत सनीदाची भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळेला त्याच्या चित्रीकरणाचे दिवस आठवत आहेत. नुकतच सोशल मिडीयावर पोस्ट करून राज व्यक्त झाला आहे. राजने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यानचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत त्याच्यासोबत राणादा साकारणारा अभिनेता हार्दिक जोशीदेखील पाहायला मिळतोय. 
या पोस्टमध्ये राज लिहीतो की, “वाडा , साहेबराव , रानादा आणि मी आठवण.” 

राज हा वाडा, साहेबराव, राणादा आणि त्याची ही भूमिका या सगळ्या गोष्टी मिस करत असल्याचं त्याच्या या पोस्टवरून पाहायला मिळतय. राज आणि हार्दिकची या मालिकेच्या निमित्ताने झालेली मैत्री यातून पाहायला मिळतेय. लवकरच चित्रीकरण सुरु झाल्यानंतरचा राजचा आनंद गगनात मावेनासा असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive