केदार शिंदे म्हणतात, ‘मराठी मनोरंजन क्षेत्रात “माल” नाही तर.....’

By  
on  

सध्या देशभरात गाजत असलेलं प्रकरण म्हणजे बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण. या प्रकरणाने बॉलिवूडवर प्रेम करत असलेल्या प्रत्येकाला विचारात पाडलं आहे. यावेळी केदार शिंदे यांनी केलेलं ट्वीट लक्ष वेधून घेत आहे. आपल्या ट्वीटमध्ये केदार शिंदे म्हणतात, ‘अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असंच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात “माल” नाही तर, रसिकांचं “मोल” महत्वाचं ठरतं….’ 

 

 

त्यांचं हे ट्वीट अनेकजण लाईक करत आहेत.  केदार शिंदे आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘सुखी माणसाचा सदरा’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेता भरत जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share