'सही रे सही' फेम ह्या जेष्ठ अभिनेत्रीचं झालं निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

By  
on  

करोना संकटामुळे तसंच इतरही अनेक कारणांमुळे यंदाचं वर्ष अनेक दु:खद बातम्या घेऊन येत आाहे. मनोरंजनविश्वासाठी तर हे वर्ष फाच वाईट ठरतंय अनेक हरहुन्नरी कलाकारांनी यंदा जगाचा निरोप घेतला. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार एका ज्येष्ठ अभिनेत्रीने नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. सही रे सही नाटक फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी या काळाच्या पडद्याआड झाल्या आहेत. 

सही रे सही ह्या केदारशिंदे दिग्दर्शित सुपरहिट नाटकातला गीतांजली कांबळी यांनी साकारलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. गीतांजली यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्या अनेक दिवसापासून कर्करोगाशी कडवी झुंज देत होत्या. पण अखेर आज शनिवारी पहाटे त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली. मुंबईतील चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. 

Recommended

Loading...
Share