By  
on  

म्हणून रितेश-जेनेलियाचं झालं असतं ब्रेकअप, वाचा धम्माल किस्सा

  ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये अनेक पाहुणे हजेरी लावत असतात. या शोमध्ये बॉलिवूडचं क्युट कपल रितेश आणि जेनिलियाने काही दिवसांपूर्वीच  हजेरी लावली होती. यावेळी सेटवर धम्माल उडाली.  अर्थातच रितेश आणि जेनिलिया यांनी अनेक बाबी कपिलशी शेअर केल्या आहेत.

बॉलिवूडचं  लाडकं सेलिब्रिटी कपल म्हणजे रितेश-जेनेलिया. विशेष म्हणजे सध्या या दोघांच्या ब्रेकअपची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. लग्नापूर्वी एकमेकांना डेट करत असताना रितेशने जेनेलियासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता, असं म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने जेनेलियासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता असं सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ कपिल शर्मा याच्या द कपिल शर्मा शो या रिअॅलिटी शोमधील असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असताना रितेशने गंमत म्हणून जेनेलियाला हे नातं संपवूया असा मेसेज केला होता. आपण ब्रेकअप करु असं त्याने म्हटलं होतं. विशेष म्हणजे रितेशचा हा मेसेज पाहिल्यानंतर जेनेलियाला ते खरं वाटतं. त्यामुळे तिने रितेशला चांगलंच खडसावलं. मात्र, या प्रकारानंतर अशी गंमत कधीच करणार नाही असं वचन रितेशने जेनेलियाला  दिलं.

रितेश आणि जेनेलिया ही जोडी 2012 साली लग्नबंधनात अडकली . ह्या दोघांना दोन गोंडस मुलंसुध्दा आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive