By  
on  

फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलं का? कॉमेडी क्वीन म्हणून आहे प्रसिद्ध

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. सहज-सुंदर विनोद साकारुन सर्वांना निखळ मनोरंजनाची पर्वणी देते. श्रेया सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती खास फोटो व्हिडियो शेअर करत असते. आताही तिने एक खास फोटो शेअर केला आहे. 

 

 

हा फोटो श्रेयाच्या लहानपणीचा आहे. या फोटोमध्ये ती आणि तिची बहीण तेजल दिसत आहे. श्रेयाने तेजलच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. ‘ तु माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी नशीबवान आहे अशी भावनाही तिने व्यक्त केली आहे.’ चला हवा येऊ द्या लॉकडाऊनच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे श्रेया अनेकदा सेटवरचे व्हिडियोही शेअर करत असते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive