
कबीर सिंह या सिेनमात अभिनेता शाहीद कपूरची मोलकरीण आठवतेय....छोटाच सीन होता पळण्याचा तीच अभिनेत्री वनिता खरात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्येसुध्दा वनिता धम्माल स्कीट्सचं सादरीकरण करते. याच वनिताने चाकोरी मोडत तिचा बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिचं या फोटोशूटसाठी अनेक स्तरातून कौतुक झालं. यानिमित्ताने तिने पीपिंगमूनशी केलेली एक्सक्लुसिव्ह बातचीत..