By | Saturday, 23 Feb, 2019

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘गुड टच आणि बॅड टच’

आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात, त्यातून आपण नेमकं काय घेतलं पाहिजे आणि काय नाही, तसेच स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसं व्यक्त व्हावं हे आतापर्यंत सोनी मराठी वरील ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात आले आहे......

Read more

By | Saturday, 23 Feb, 2019

राजेश श्रृगांरपुरे आणि भूषण प्रधान यांचा आक्रमक 'शिमगा'

कोकणातील 'शिमगा' हा सण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. कोकणातील याच 'शिमगा' सणाशी संबंधित 'शिमगा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर आणि चित्रपटाचे टायटल साँग.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

रॉम-कॉम ‘ती अँड ती’ टीम आणि पत्रकार यांच्यामध्ये रंगला दिलखुलास संवाद

प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून नवीन विषय, नवीन जोडी पाहायला मिळाल्यावर ‘आपले मनोरंजन नक्की होणार याची खात्री पटतेआणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच अर्बन रोमँटिक कॉमेडी जॉनर  मराठी सिनेमा ‘ती अँड ती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमात प्रेक्षकांना नवीन विषयासह कलाकारांची युनिक निवड, सोबतीला मजेशीर डायलॉग्स, सुंदर गाणी आणि लंडनमध्ये पूर्ण सिनेमा शूट झाल्यामुळेतेथील लोकेशन अनुभवयाला आणि पाहायला मिळणार आहेत.

ही कहाणी आहे  ‘अनय ‘ ची  जो एक स्वप्नाळू मुलगा आहे. चौथीत असताना शाळेतल्या एका मुलीवर त्याचा जीव जडतो आणि "ती" शाळा सोडून गेल्यावरही तो "तिला" कधीच विसरू शकत नाही. रोमान्सच्या त्याच्या कल्पना मनातचराहतात. पण एके दिवशी जणू देव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याची "ती" त्याला भेटते... प्रॉब्लेम एवढाच असतो की तेव्हा तो त्याच्या बायको बरोबर हनिमूनला गेलेला असतो.

इंग्लंडच्या निसर्ग सुंदर लोकेशन्सवर चित्रित झालेल्या "ती आणि ती" च्या कथानकात जेवढी गंमत आहे तीच धमाल आपल्याला या "रॉमकॉम" मध्ये बघायला मिळणार आहे. निर्माता आणि प्रमुख भूमिका अशा दोन्ही जबाबदाऱ्या पुष्करजोगनी यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. चित्रपटातल्या "ती" आणि "ती" च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे ह्यांनी सुरेख रंग भरले आहेत.  सिद्धार्थ चांदेकर ही एका विशेष भूमिकेत आपल्याला या चित्रपटात भेटेल.

या सिनेमाच्या निमित्ताने मुंबईतील पत्रकारांसोबत मनमोकळा संवाद साधण्यासाठी ‘ती अँड ती’ सिनेमाच्या टीमची मुंबईमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, कलाकारपुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, सिध्दार्थ चांदेकर, निर्माते वैशाल शाह, मोहन नादर, लेखक विराजस कुलकर्णी उपस्थित होते. तसेच, त्यांच्या सोबतीला संगीतकार साई-पियुष, आणि गायिका महालक्ष्मीअय्यर यांची देखील उपस्थिती होती.

प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणारी अभिनेत्रीदिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसते. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे इंग्लंड मध्ये झालेले आहे आणिगंमत म्हणजे या चित्रपटाची कथा पटकथा विराजस कुलकर्णी ह्यांनी लिहिलेली आहे. संवादलेखक आहेत मर्मबंधा आणि विराजस कुलकर्णी .

चित्रपटाला संगीत नव्या दमाच्या साईपियुष ह्यांनी दिले आहे आणि चित्रपटातील धमाल गाण्यांना आवाज अवधूत गुप्ते, महालक्ष्मी अय्यर, रोहित राउत, जुईली जोगळेकर, गौरव बुरसे आणि अर्पिता चक्रवर्ती यांनी दिला आहे.छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे हर्षवर्धन पाटील ह्यांनी तर संकलन आहे अर्जुन मोगरे ह्यांचे, ध्वनी लेखक आहेत स्वराधीश स्टुडियोचे स्वरूप जोशी तर प्रमुख सहायक दिग्दर्शक आहेत जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी.

 
Read more

By | Friday, 22 Feb, 2019

स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडेचे नवीन गाणं ‘माझ्या रानफुला’

आतापर्यंत आपण वेगवेगळ्या धर्मावर, जातीवर चित्रित केलेले सिनेमे पाहिले. मात्र महाराष्ट्रात अशी एक जमात आहे, जी नेहमीच मागासलेली आणि सध्याच्या सोयीसुविधांपासून वंचित राहिली आहे, ती म्हणजे आदिवासी जमात. ही जमात कशी होती आणि हे लोक.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

अभिनेत्री स्मिता तांबे करतेय ‘सावट’ चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

गेलं जवळ जवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमूळे स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतेय. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या 'सावट' ह्या सिनेमाची.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

रहस्यमयी 'मिरांडा हाऊस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठीमध्ये  वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत आहेत. सोबतच मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोगही होत आहेत. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित 'मिरांडा हाऊस' या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिगदर्शक.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या 'आम्ही बेफिकर'चा पाहा ट्रेलर

कॉलेजची चार-पाच वर्षं म्हणजे अगदी मंतरलेलं जग असतं. मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, राडे-भांडणं, प्रेम-प्रेमभंग असा सगळा माहौल या कॉलेजच्या दिवसांत प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. "आम्ही बेफिकर" या चित्रपटातून कॉलेजचं हे जग आता पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार आहे. सोशल.....

Read more

By | Thursday, 21 Feb, 2019

'सैराट'च्‍या आर्चीची 12वीची परीक्षा,कॉलेजकडून पोलिसांना बंदोबस्ताची मागणी

नागराज मंजुळेंच्या सैराट फेम सिनेमातील आर्चीची क्रेझ अजूनही ओसरलेली नाही. अजूनही सर्वांना आर्चीॉची एक झलक पाहण्याचं वेड लागलंय. या सिनेमामुळे आर्ची एका रात्रीत स्टार झाली आणि प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. पण याचा त्रास आर्ची साकारणारी अभिनेत्री.....

Read more