By | Thursday, 21 Feb, 2019

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा

आशयघनता आणि व्यावसायिक गणितं याची उत्तम सांगड घालीत यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख चढता आणि गौरवशाली राहिला आहे. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी नव्या फळीचे निर्माते दिग्दर्शक घेताना दिसताहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्या देखील मराठी.....

Read more

By | Wednesday, 20 Feb, 2019

सोनी मराठीवर होणार ‘बॉईज 2’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

शालेय जीवनात दंगा-मस्ती केलेले ‘बॉईज’ कॉलेजमध्ये काय कल्ला करतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी ‘बॉईज २’ला प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला. कलाकारांचा अभिनय, त्यांचे डायलॉग्स आणि गाण्यांमुळे‘बॉईज २’ सिनेमा चांगलाच गाजला होता. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार असल्यामुळे कॉलेजमधली त्यांची मज्जा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सोनी मराठीने आतापर्यंत अनेक मालिकांतून प्रेक्षकांची अभिरुची जाणली आहे आणि आता सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दाखवून प्रेक्षकांचा विकेंडही स्पेशल बनवत आहेत. पार्थ भालेराव, प्रतीक लाड आणिसुमंत शिंदे यांचे कॉलेज पुराण असलेल्या ‘बॉईज २’ सिनेमात आताची पिढी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत अथवा त्यांच्या अवतीभोवती जे काही घडते ती परिस्थिती मांडली आहे. जसे की इंटरनेटचा अयोग्य वापर. तसेच मुलांना न रागवतात्यांच्या कलेने त्यांना समजून सांगितले पाहिजे हा संदेश यातून देण्यात आला आहे.

इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अवधुत गुप्ते प्रस्तुत, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया निर्मित ‘बॉईज २’ सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. यंग बॉईजसह शर्वरी जमेनिस, यतिन कार्येकर, अमित्रीयन पाटील, पल्लवी पाटील, ओंकार भोजने, गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांच्या देखील भूमिका यामध्ये आहेत.

https://twitter.com/sonymarathitv/status/1096018882832166913

शाळेतली दंगा-मस्ती संपवून, कॉलेजमध्ये राडा सुरु करणा-या ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पाहा रविवारी २४ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ फक्त फक्त सोनी मराठीवर.

.....

Read more

By | Wednesday, 20 Feb, 2019

पाहा कॉलेजविश्वातील तरुणाईचा वेध घेणा-या ‘सेक्स,ड्रग्ज अ‍ॅण्ड थिएटर’चा टीझर

कॉलेज विश्व म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील बिनधास्त,मस्तीचे आणि बेफिकीरीचे मोरपंखी दिवस. आपलं कॉलेज, स्पर्धा, एकांकिका, प्रोफेसर, मित्र-मैत्रिणी यांच्याभोवतीच गुंफलेलं असतं. असाच एक हटके विषय घेऊन शाळा आणि फुतंरु सिनेमाफेम दिग्दर्शक सुजय डहाके प्रेक्षकांसमोर येतोय. पण ह्यावेळेस सिनेमा.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

आला रे आला चांदणं रातीला 'शिमगा' आला ...

होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी सगळे गावकरी ग्रामदेवतेच्या देवळात जमतात आणि नाचत ढोलताश्यांच्या गजरात, होम करून धुमधडाक्यात शिमगा साजरा करतात . हा सण साजरा.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

'जजमेंट'साठी प्रतिक देशमुखने कमी केले वजन

‘शुभ लग्न सावधान’ सिनेमामधून एनआरआय रोहनच्या भूमिकेत दिसलेला चॉकलेट हिरो प्रतिक देशमुख आता आपल्या आगामी सिनेमात वेगळ्याच लूकमधून दिसणार आहे. आगामी ‘जजमेंट’सिनेमात तो यदुनाथ साटम ह्या नैराश्यग्रस्त तरूणाच्या भूमिकेत दिसेल.

आपली पहिली फिल्म ‘शुभलग्न सावधान’ करतानाच.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

नागराज मंजुळेंची परदेशात शिवजयंती,हा सेल्फी काढून महाराजांना दिला मानाचा मुजरा

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. १९ फेब्रुवारी १६३० साली महाराजांचा जन्म झाला. मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणा-या महाराजांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून फक्त देशातच नाही तर परदेशातही उत्साहाने साजरी केली जाते. लहान-थोर सर्वांनाच शिवजयंती.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

अमिताभ बच्चन यांनी मित्र सचिन पिळगावकर यांना दिल्या खास शुभेच्छा

प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेता सिनेमाच्या माध्यमातून एखादा नवीन विषय प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्यावर त्याचे जर कौतुक करण्यात आले आणि मोठ्या व्यक्तींकडून शुभेच्छा मिळाल्या की सिनेमाशी निगडीत प्रत्येक व्यक्तीला खूप आनंद होतो आणि हा आनंदाचा क्षण.....

Read more

By | Monday, 18 Feb, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडणार आता छोट्या पडद्यावर

भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वाचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गौरव गाथा आपण आत्तापर्यंत फक्त सिनेमा आणि माहितीपटातून पाहिली आहे. पण आता लवकरच बाबसाहेबांचा जीवनपट छोट्या पडद्यावर मालिका स्वरुपातत उलगडणार आहे.

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे.....

Read more