By  
on  

मोठी बातमी ! अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

बॉलिवूडसह देशाला हादरवून टाकणा-या जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं. आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला होता. आज कोर्टाने याप्रकरणी निकाल दिला असून सर्व आरोपांतून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता झाली आहे. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला.

जिया खानच्या आईने याप्रकरणात अनेक आरोप सुरज पांचोलीवर केले होते. शारिरिक व मानसिक छळ हे त्याच्यावरचे मुख्य आरोप होते. जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. २० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. 

 

 

 

“पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालंय,” असं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं. विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी या खटल्यातील पुराव्यांचा अभाव लक्षात घेऊन हा निकाल दिला.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive