बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना करोनाची लागण, स्वत:च दिली माहिती

By  
on  

राज्यात करोनाचं संकट जैसे थे आहे. त्यात अजूनही रूग्णांच्या संख्येत वाढ सुरुच आहे. दररोज नवनव्या रुग्णांची माहिती समोर येत आहे. करोनाची लागण सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच होताना पाहायला मिळतेय, अशातच आता बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना करोनाची लागम झाल्याचं समोर येतंय.खुद्द अनिल थत्ते यांनीच एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

“सध्या मी रुग्णालयात असून मला करोनाची लागण झाली आहे,” असं अनिल थत्ते म्हणाले. गेले अनेक दिवस करोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो. परंतु आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलो", असं अनिल थत्ते या व्हिडीओत सांगताना दिसतायत. तसंच ते पूर्ण बरे झाल्यानंतर प्लाझमा दान करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. 

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अनिल थत्ते हे स्वयंघोषित पत्रकार चांगलेच चर्चेत आले होते. 

Recommended

Loading...
Share