पाहा Video : सध्या फिटनेसकडे लक्ष देत आहे 'सैराट'मधील हा कलाकार

By  
on  

'सैराट' या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरक्षह वेड लावलं होतं. या सिनेमासह या सिनेमातील आर्ची आणि परश्यालाही प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती. या दोन्ही भूमिका साकारणारे कलाकार रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर आपआपल्या करियरमध्ये विविध गोष्टी करत आहेत. एकीकडे रिंकू विविध मराठी सिनेमे आणि ओटीटीवरही लक्ष वेधतेय. तर दुसरीकडे आकाशनेही मराठी सिनेमा आणि ओटीटीमध्ये पाऊल टाकलं.

आकाश ठोसरचीही प्रचंड लोकप्रियता आहे. सोशल मिडीयावरही त्यांचे अनेक चाहते आहेत. मात्र असं असलं तरी आकाश सध्या स्वत:वर प्रचंड मेहनत घेत आहे. आकाश सध्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतोय. जीममध्ये घाम गाळून तो फिट बॉडीसाठी विविध वर्कआउट करतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

NO EXCUSES JUST DO IT

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

या वर्कआउटचे व्हिडीओ आकाश त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करत असतो. नुकताच आकाशने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. फिटनेससाठी विविध प्रकारचे व्यायाम करावे लागतात. त्यापैकीच कठीण व्यायाम करताना आकाश या व्हिडीओत दिसतोय. 

मात्र आकाश एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी तर ही मेहनत घेत नाहीय ना असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या व्हिडीओला आकाशच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

Recommended

Loading...
Share