पाहा Video : जिजाने अशी केली उर्मिला आणि आदिनाथ कोठारेसोबत मस्ती

By  
on  

बॉलिवुडप्रमाणे मराठीतीलही अनेक स्टारकिड्स चर्चेत आहेत. यापैकीच एक आहे जिजा कोठारे. जिजा ही अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिलाची मुलगी आहे. सोशल मिडीयावर जिजाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत असतात. सोशल मिडीयावरही जिजा चांगलीच लोकप्रिय आहे.

आदिनाथ आणि उर्मिला जिजासोबतच्या विविध गोष्टी सोशल मिडीयावर शेयर करताना दिसतात. नुकताच डॉटर्स डेच्या निमित्ताने उर्मिलाने जिजासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत जिजा ही आई-बाबा म्हणजे आदिनाथ आणि उर्मिलासोबत पाण्यात मस्ती करताना दिसत आहे.

गोंडस जिजाचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये उर्मिला लिहीते की, "हे आमच्या मुलीसाठी, कधीच विसरू नकोस की आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. आयुष्य हे चांगल्या आणि वाईट क्षणांनी भरलेलं आहे. प्रत्येक गोष्टींमधून शिकण्याचा प्रयत्न कर. अशी महिला बन जी आम्हाला माहिती आहे तू बनू शकते. प्रेम, आई आणि डॅडा"

उर्मिलाने या पोस्टमधून मुलीसाठी हा खास मेसेज लिहीलेला आहे. 

Recommended

Loading...
Share