उषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

By  
on  

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागा तर्फे दरवर्षी देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ट गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने 2020-2021 साठीच्या पुरस्कारासाठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली आहे.यात 5 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्स असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

उषा मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने असंख्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे. त्यांनी दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी गायलेली गाणी असो किंवा राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनात गायलेल्या लावण्या असतो त्यांना प्रेक्षकांच भरपुर प्रेम मिळालं. त्यांनी अनेक भावगीते, भक्तिगीतेही गायली आहेत.  त्यांचं मुंगडा हे गाणही प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. याशिवाय 'सुबह का तारा', 'जय संतोषी माँ', 'आझाद', 'चित्रलेखा', 'खट्टा मीठा', 'काला पत्थर', 'नसीब', 'खुबसूरत', 'डिस्को डान्सर', 'इनकार' अशा अनेक हिंदी चित्रपटांतील त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. 

  

दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार गायन आणि संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ कार्य केलेल्या कलाकारांना राज्य शासनातर्फे दिला जातो. 1992 पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराला सुरुवात झाली होती. संगीतकार राम-लक्ष्मण, उषा खन्ना, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका सुमन कल्याणपुर, आशा भोसले, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसह अनेक नामवंत कलाकारांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.

Recommended

Loading...
Share