By  
on  

पाहा Photos : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील पश्या खऱ्या आयुष्यात दिसतो असा

'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सध्या वेग घेताना दिसते. मालिकेत अनेक ट्विस्टही पाहायला मिळत आहेत. एका कुटुंबाची साधी सोपी गोष्ट या मालिकेत आहे. भावंडांमधील नात्यावर ही मालिका भाष्य करते. या मालिकेतील प्रत्येक पात्र लक्षवेधी ठरत आहे.

या मालिकेतील पश्याची भूमिकाही चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. अभिनेता आकाश नलावडे या मालिकेत पश्याची भूमिका साकारत आहे.

आकाशची ही पहिलीच मालिका आहे. आकाशने पुण्यातील ललित कला केंद्रमधून अभिनयाचं शिक्षण घेतलेलं आहे. पश्याच्या भूमिकेसाठी त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

आकाशचे खऱ्या आयुष्यातील फोटो त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. या फोटोंमध्ये मात्र हँडसम लुकमधील आकाश पाहायला मिळतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive