By  
on  

मितालीला आली गेल्या वर्षीच्या या ट्रीपची आठवण, फोटो केले शेयर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी सोशल मिडीयावर चर्चेत असते. मेड फॉर इच अदर असं हे कपल त्यांच्या चाहत्यांनाही आवडतय. मागली वर्षी या दोघांचा साखरपुडा झाला होता. यावर्षी दोघं लग्नबंधनात अडकणार होते मात्र लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे दोघांचं लग्न पुढील वर्षी होणार आहे. 

सिद्धार्थ आणि मिताली दोघांनाही फिरण्याची आणि भटकंती करण्याची प्रचंड आवड आहे. दोघांनी देशाबाहेर विविध ठिकाणी एकत्र प्रवास केलेला आहे. सोशल मिडीयावरही त्यांच्या विविध ट्रिपचे फोटो पाहायला मिळतात. मात्र सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत दोघंही बऱ्याच काळापासून कुठेही फिरायला गेलेले नाहीत. म्हणून मितालीला सध्या तिच्या विविध ट्रिपची आठवण येत आहे. 

मितालीने नुकतेच काही ट्रिपचे थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. मागील वर्षीच्या या सुंदर आठवणींना मितालीने उजाळा दिला आहे. सोशल मिडीयावर तिने केलेल्या या पोस्टमध्ये सिद्धार्थ आणि मितालीचे फोटो पाहायला मिळत आहेत. दोघांनाही सध्या त्या दिवसांची आठवण येत आहे. 

या पोस्टमध्ये मिताली लिहीते की, "आपण माझ्या काही पर्यंटन फोटोंचा आस्वाद घेत असताना, मी माझ्या उशीत किंचाळेल आणि बाथरुममध्ये रडत असेल."

सध्याच्या काळात अनेकांना कोरोनाग्रस्त परिस्थितीचा कंटाळा आलेला आहे. यात कुठे बाहेर फिरताही येत नसल्याची खंत मितालीने या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive