विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर आपल्या सगळ्यांचेच लाडके आहेत. जॉनी यांनी आपल्या अदाकारीने रसिकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं आहे. जॉनी यांची हिच अदाकारी आपल्याला आता मराठीमध्येही अनुभवता येणार आहे. अभिनेता जॉनी लिव्हर मराठी शो ‘एक टप्पा आऊट’मधून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. एप्रिलमध्ये हा शो प्रसारित केला जाईल. जॉनी या जजच्या भूमिकेत असतील. जॉनी यांच्यासोबत अजून दोन परीक्षक या शोच्या जजचं काम पाहतील.
यावर जॉनी लिव्हर म्हणतात, ‘एक टप्पा आऊट हा नव्या विनोदी कलाकारांना उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मी महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहेच. पण या शोसोबत जोडला गेलो असल्याचा अभिमानही वाटतो.’ जॉनी यापुर्वी सब टीव्हीवरील ‘पार्ट्नर्स’ या मालिकेत दिसले होते. मराठीमध्ये कधी दिसणार याची चाहत्यांनाही उत्सुकता आहे.