हिरवा शालू,चोळी, चुडा घालून अशी नटली हास्यजत्रेची विनोदवीर नम्रता

By  
on  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतो. लॉकडाउन पासून ते अनलॉकपर्यंत या कार्यक्रमाने घरात बसलेल्या प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. लॉकडाउनच्या काळातही या कार्यक्रमाचे रिपीट भाग प्रेक्षकांनी पाहिले. आणि आता पुन्हा नव्याने सुरुवात केलेल्या नव्या भागांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे.

या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर हा त्यांच्या हटके परफॉर्मन्स आणि स्टाईलने लक्षवेधी ठरतो. अभिनेत्री नम्रता संभेरावचे परफॉर्मन्सही प्रेक्षक मिस करत नाहीत ते आवर्जुन पाहतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या कार्यक्रमात नम्रता विविध भूमिका साकारताना दिसते. त्यासोबतच तिचे पेहराव, भाषेची लकब, उत्तम विनोदाचं टायमिंग या सगळ्याच गोष्टीतून ती प्रचंड हसवते. नुकताच असाच एक हटके परफॉर्मन्स घेऊन नम्रता आली आहे. या परफॉर्मन्ससाठी तिने खास ट्रेडिशनल लुक केला आहे.

 

सोशल मिडीयावर नम्रताने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत नम्रता हिरवा शालू नेसलेली पाहायला मिळते. सोबतच चंद्रकोर, हिरवा चुडा आणि दागदागिन्यांनी नम्रता नटलेली पाहायला मिळतेय. प्रत्येक परफॉर्मन्सप्रमाणे नम्रता तिच्या या परफॉर्मन्समधून काहीतरी नवीन घेऊन येणार आणि प्रेक्षकांना भरपुर हसवणार यात शंका नाही.

नम्रताने या कार्यक्रमात विविध पात्रे साकारली आहेत. तिचं या कार्यक्रमातील लॉली हे पात्र तर प्रचंड लोकप्रिय झालं आहे.

Recommended

Loading...
Share