By  
on  

अभिनेत्री पूजा सावंतच्या या सिनेमाला झाली पाच वर्षे पू्र्ण

मुंबईतील गँगस्टर अरुण गवळी आणि त्याची दगडी चाळवर आधारित 'दगडी चाळ' हा सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अभिनेता मकरंद देशपांडे यांनी या सिनेमात अरुण गवळींची भूमिका साकारली होती. "चुकीला माफी नाही" हा या सिनेमातील डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला होता.

अभिनेता अंकुश चौधरी आणि पूजा सावंत ही जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अंकुश आणि पूजाने सोशल मिडीयावर पोस्ट करून या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

5 years of ‘दगडी चाळ’ ️ How time flies

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

पूजाने या सिनेमाची आठवण करून देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "दगडी चाळची पाच वर्षे, वेळ कसा निघून जातो.." या सिनेमाची एक्शन सीन, संवाद, गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती.

या सिनेमाचा लवकरच दुसरा भागही येणार आहे. दुसऱ्या भागातही पूजा सावंत झळकणार आहे. मात्र 'दगडी चाळ-2' मध्ये काय पाहायला मिळेल याचीच उत्सुकता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive