अभिनेत्री अमृता खानविलकर फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरुक असते. कधी विविध वर्कआउट तर कधी योगा, या सगळ्या गोष्टी अमृता फिटनेससाठी करताना दिसते. शिवाय अमृताला नृत्याची आवड असल्याने ती लवचिक आहे. मात्र आता पुन्हा एकदा अमृता फिटनेससाठी नवी गोष्ट केली आहे. ती म्हणजे जिमनॅस्टिक्स.
जिमनॅस्टिक्स जसं पाहायला कठिण वाटतं त्याहून अधिक ते करताना कठिण असते. सध्या जिमनॅस्टिक्स ट्रेनिंग अमृता जिद्दीने करताना दिसत आहे. अमृताने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमृता जिमनॅस्टिक्सचे विविध प्रकार करताना दिसत आहे.
ती या पोस्टमध्ये लिहीते की, "कुलदिपसोबत ट्रेनिंग करणे हे खूप मजेशीर आणि आव्हानात्मक अनुभव आहे. माझ्यासोबत धीर धरल्याबद्दल धन्यवाद. सर तुमच्यासोबत परत येण्याची वाट पाहू शकत नाही."
अमृताने पोस्ट केल्याप्रमाणे अमृता पुन्हा या ट्रेनिंगला सुरुवात करणार असल्याचं पाहायला मिळतय.
अमृताने आत्तापर्यंत अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अमृता अनेक मराठी, हिंदी रिएलिटी शोमध्येही झळकली आहे. एक अभिनेत्रीसह अमृताची एक उत्तम नृत्यांगना म्हणून देखील ओळख आहे.