By  
on  

लावणी स्पेशल भागासाठी अप्सरा सोनाली कुलकर्णीचा खास लुक, दिसली या सुंदर पेहरावात

'डान्सिंग क्विन' या नव्या डान्सिंग कार्यक्रमातून साईझ लार्ज स्पर्धक त्यांचं नृत्यकौशल्य दाखवताना दिसत आहेत. नुकत्याच सुरु झालेल्या या कार्यक्रमात स्पर्धकांचे एकापेक्षाएक परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आर जे मलिष्का या कार्यक्रमात परिक्षक म्हणून आहेत. या स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहून हे परिक्षकदेखील थक्क झाले आहेत.

या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगळी थिम असते. यंदा लावणी विक थिम ठेवण्यात आली होती. यावेळी स्पर्धकांनी एकापेक्षा एक लावणी मंचावर सादर केल्या. तर दुसरीकडे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या खास स्पेशल भागासाठी खास लुक केला होता. यावेळी सोनाली गुलाबी रंगाच्या हटके साडी लुकमध्ये दिसली.

सोशल मिडीयावर सोनालीने या लुकचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या लुकमध्ये सोनालीचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive