By  
on  

'आई कुठे काय करते' मधील या अभिनेत्याने असे मानले मालिकेच्या टीमचे आभार

 'आई कुठे काय करते' ही मालिका आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं बनलं आहे. कमी कालावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं आहे. सध्या मालिकेची कहाणी वेगळ्या वळणावर आहे. त्यामुळे प्रेक्षक आणखी उत्सुकतेने या मालिकेचे प्रत्येक भाग न चुकता बघत आहेत. शिवाय ही मालिका टेलेकास्ट होत असलेली स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीमध्ये अव्वल ठरली आहे. आणि या मालिकेलाही मोठं यश मिळालं आहे.

या मालिकेच्या यशाचं श्रेय या मालिकेतील कलाकारांनी दिग्दर्शक, लेखिका, क्रू मेम्बर्स यांसह सगळ्यांना दिलं आहे. या मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखही याचं श्रेय संपूर्ण टीमला देता. नुकतच त्याने या निमित्ताने सोशल मिडीयावर या मालिकेसाठी ऑफस्क्रिन काम करणाऱ्या टीमसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.


या पोस्टमध्ये अभिषेक लिहीतो की, "मजा करतो, धन्यवाद.“आई कुठे काय करते” तुम्हाला सगळ्यांना..आणि संपूर्ण Team ला..असेच एकत्र हसत काम करत राहू..अजून काय?"

Author

Recommended

PeepingMoon Exclusive