By  
on  

राणादाला या खास व्यक्तिकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांनी इतकी वर्षे पसंती दिली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राणादा आणि अंजलीची जोडी. दोघही प्रचंड लोकप्रिय झाले. त्यातच राणादाच्या भूमिकेची स्टाईल, बोलण्याची लकब, त्याचे डायलॉगही लोकप्रिय झाले. याच राणादाच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीचा आज वाढदिवस आहे. म्हणूनच सोशल मिडीयावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happiest birthday to you hardik ! @hardeek_joshi

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

 

यात हार्दिकला एका खास व्यक्तिकडूनही शुभेच्छा मिळाल्या आहेत. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती व्यक्ती आहे पाठक बाई म्हणजेच अंजली साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर. अक्षयाने हार्दिकसोबतचा फोटो पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Bhava @hardeek_joshi

A post shared by Raj Hanchanale (@raj_hanchanale) on

 

तर दुसरीकडे मालिकेत राणाच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळेने देखील त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करून  हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासह हार्दिकच्या चाहत्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

या मालिकेत हार्दिक हा कुस्तीपटू राणाच्या भूमिकेत दाखवला. त्याला सगळे राणादा म्हणून बोलत असत. त्यामुळे हा राणादा प्रचंड प्रसिद्ध झाला. हार्दिकची शरीरयष्ठी या भूमिकेली साजेशी ठरली. राणाचा "चालतय की.." हा डायलॉग तर प्रचंड फेमस झाला होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive