By  
on  

सई लोकूरने पोस्ट केला फियान्सेसोबतचा हा फोटो

अभिनेत्री सई लोकूरचा नुकताच साखरपुडा पार पडला. फियान्से तिर्थदीप रॉयसोबत सईने साखरपुडा केला आहे. याआधी काही दिवसांपासून सई प्रेमात असल्याचं सोशल मिडीयावरून सांगत होती. त्यानंतर सई तिर्थदीपसोबतचे पाठमोरे फोटो पोस्ट करत होती. सईच्या या पोस्टने सगळ्यांनाचा कोड्यात पाडलं. 

त्यानंतर सईने तिच्या मेहेंदीचे फोटो पोस्ट केले होते. यानंतर उत्सुकता आणखी वाढली. सई लग्न करते की काय असं अनेकांना वाटलं. मात्र साखरपुड्याच्या फोटोंनी या प्रश्नांच उत्तर दिलं. सई आणि तिर्थदीपचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सईने सोशल मिडीयावर पोस्ट करून सगळ्यांनाच गुड न्यूज दिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

With the fiance ️ @tirthadeep_roy My sunshine for life

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 

नुकतच सईने आता तिर्थदीपसोबतचा आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "फियान्से, आयुष्यभरासाठी तू माझा सूर्यप्रकाश."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive