By  
on  

बाळूमामा फेम सुमीत पुसावळेला चाहतीने दिलं हे सरप्राईज, सुमीतने मानले आभार

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं. मालिकेसह मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेही लोकप्रिय झाला. सोशल मिडीयावरही सुमीतचे आणि या मालिकेचे असंख्य चाहते आहेत.

नुकत्याच एका चाहतीने या मालिकेविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. एका चाहतीने सुमीतचे चेहरा असलेली बाळूमामाची मूर्ती साकारली आहे. सुमीतने सोशल मिडीयावर या मूर्तीचा फोटो शेयर केला आहे. सुमीत या पोस्टमध्ये लिहीतो की, "श्री. जया सुतार यांनी माझा चेहरा असलेली बाळूमामाची मूर्ती साकारली आहे .खुप धन्यवाद."

 

सुमीतने ही पोस्ट करून त्या चाहतीचे आभार मानले आहे. सुमीतवर चाहत्यांच्या प्रेमाचा असाच वर्षाव होताना पाहायला मिळतो. बाळूमामा या मालिकेतून लोकप्रिय झालेला सुमीत सोशल मिडीयावरही लोकप्रिय आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive