By  
on  

गोव्यात सोनाली लुटतेय सुट्टीचा आनंद, पाण्यात उडी मारून असा मारला सूर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या फियान्से कुणाल बेनोडेकर आणि भाऊ अतुलसोबत गोव्यात सुट्टीची मजा लुटतेय. सोनालीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. मात्र सोनालीने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. चाहत्यांनीही तिच्या या व्हिडीओवर भरपुर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ आहे पाण्यात उडी घेतानाचा. सोनाली, कुणाल आणि अतुल यांनी उंचावरून पाण्यात उडी घेतल्याचा हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओत सोनाली पाण्यात सूर मारताना दिसत आहे. आणि गंमतीत ती या पोस्टमध्ये लिहीते की, “सूर नवा ध्यास नवा, विश्वासाची झेप घेतली."

 

या व्हिडीओत सोनाली अगदी उत्साह आणि आनंदात सूर मारताना दिसत आहे. यासोबत कुणाल आणि अतुलही सोनालीसोबत पाण्यात उडी घेताना दिसत आहेत. गोव्यातील तिच्या या खास ट्रीपचे क्षण सोनाली सोशल मिडीयावर शेयर करत आहे. काही दिवसांपूर्वी सोनालीने गोव्यातील बिचवरील व्हिडीओही पोस्ट केला आहे. दररोजच्या कामातून ब्रेक म्हणून सोनाली फियान्से कुणाल आणि भाऊ अतुलसोबत निवांत वेळ घालवुन रिफ्रेश होताना दिसत आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive