By  
on  

पाहा Video : अमृता धोंगडे म्हणते "माझा रूबाब हाय अनमोल", सुमीच्या दिलखेचक अदा

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मिडीयावरही लोकप्रिय ठरली आहे. सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अृमता तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करते. मालिकेच्या सेटवरील गोष्टीही ती पोस्ट करत असे. मात्र आता या मालिकेने निरोप घेतला आहे.

अमृताने सोशल मिडीयावर नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओची सध्या चर्चा आहे. अमृता या व्हिडीओमध्ये साडी लुकमध्ये पाहायला मिळतेय. सोबतच तिने नथही घातली आहे. अमृता या लुकमध्ये मराठमोळी सुंदरी दिसत आहे. 'माझा रूबाब हाय अनमोल' या गाण्यावर अमृताने हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

What say????.... #reels #sumi #MrsMukhyamantri #amrutadhongade_official

A post shared by Amruta Dhongade (अमृता धोंगडे) (@amrutadhongade_official) on

 

'मिसेस मुख्यमंत्री' मधील अमृताचं सुमीचं पात्र मोठ्या प्रमाणात पसंत करण्यात आलं. या मालिकेती अभिनेता तेजस बर्वेसोबतची तिची केमिस्ट्रीही लोकप्रिय ठरली. याआधी अमृता 'मिथून' या सिनेमातही झळकली होती. याच सिनेमातून तिने मराठी मनोरंजन विश्वात एन्ट्री केली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive