'चंद्र आहे साक्षीला' मालिकेची उत्सुकता, सुबोध भावेने पोस्ट केला हा फोटो

By  
on  

अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री करतोय. अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर आता सुबोध भावे 'चंद्र आहे साक्षीला' या नव्या मालिकेत दिसणार आहे. ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे.

नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. आणि आता सुबोध भावेने या मालिकेतील त्याचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. सुबोध भावेच्या चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चंद्र आहे साक्षीला

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरच भेटीला येणार आहे. याआधी सुबोधने 'तुला पाहते रे' या मालिकेतून खलनायक साकारला होता. ती मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेत सुबोध त्याच्या चाहत्यांसाठी काय सरप्राईज घेऊन येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share