By  
on  

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने प्रिया बेर्डे यांना बसला धक्का, म्हटल्या "खूप शॉक बसला मला"

ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अविनाश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी राहत्या घरी निधन झालं. ही बातमी कळताच अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना अविनाश यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर त्यांनाही धक्का बसला आहे.

प्रिया बेर्डे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून त्यांचं दु:ख व्यक्त केलं आहे. प्रिया बेर्डे यांनी सुद्धा अविनाश यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्या या पोस्टमध्ये लिहीतात की, "अविनाश खर्शीकर ... हे असं जाणं योग्य नव्हे, खूप शॉक बसला मला, मी शाळकरी होते तेव्हा पासून बघत आलेय मी याला, नंतर याची हिरोइन पण झाले, माझ्या वडिलांनि दिग्दर्शित केलेल्या बंदिवान मी या संसारी या फिल्म मध्ये अविनाश पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला, अत्यंत उमद व्यक्तिमत,हुशार, व्यवहारीआणि सेन्सिबल माणूस होता, फार वाईट वाटलं त्याच्या अचानक जाण्याने, तुला शांती मिळो हीच प्रार्थना . 2020 बास आता खूप झालं, इथेच थांब..."

 

2020 या वर्षात मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. यातच अविनाश यांच्या जाण्यानं प्रिया यांना शॉक बसल्याचं त्या सांगतात. अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही अविनाश यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

 

तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही ट्विट करून अविनाश खर्शीकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive