By  
on  

पाहा Video : शिव ठाकरे म्हणतो, "आधुनिक काळातला असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारांनी चालतो"

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे हा स्पर्धक प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीनेच सगळ्यांना चकित केलं होतं. अमतावतीच्या या हटके अंदाजातील मुलाने बिग बॉसमधून सगळ्यांचीच मनं जिंकली होती. एवढच नाही तर चक्क बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या विजेते पदाची ट्रॉफी देखील त्याने मिळवली होती. शिव ठाकरे हा बिग बॉस मराठीचा विजेता ठरला होता.
सोशल मिडीयावर शिव हा मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो आणि त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो. सोशल मिडीयावर त्याच्या मोठा चाहतावर्ग आहे. 

नुकताच शिवने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत शिव बिचवर घोडेस्वारी करताना दिसतोय. शिव या व्हिडीओत घोडेस्वारीचा आनंद लुटताना दिसतोय. मात्र या पोस्टमध्ये शिव लिहीतो की, “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती......हा मावळा आधुनिक काळातला असला तरी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारांनी चालतो.”
शिव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालत असल्याचं या पोस्टमध्ये सांगतो.
बिग बॉसच्या घरात शिवची सहस्पर्धक वीणासोबत मैत्री झाली होती. नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. शिव आणि वीणा हे कपल बिग बॉसमध्ये चांगलच लोकप्रिय ठरलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही दोघांची जोडी लोकप्रिय ठरते. सोशल मिडीयावर या जोडीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive