पाहा Photos : अभिनेत्री पूजा सावंतच्या ग्लॅमरस अदा

By  
on  

अभिनेत्री पूजा सावंतचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. पूजा ही सोशल मिडीयावर तिचे अनेक फोटो पोस्ट करताना दिसते. नुकतच पूजाने तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये पूजा हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसतेय. या पेहरावात पूजाचा हटके लुक पाहायला मिळाला.

पूजाचे हे लुक सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. 

सोशल मिडीयावर पूजा हे अनेकदा तिचे विविध थिममधील फोटोशूट पोस्ट करते. नुकत्याच केलेल्या फोटोशूटलाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

पूजाने आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. 'जंगली' या हिंदी सिनेमातही पूजा झळकली होती.

Recommended

Loading...
Share