अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरला शर्मिष्ठा फियान्से तेजस देसाईसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या शर्मिषठाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडत आहेत. त्यातच नुकताच मेहंदी सोहळाही पार पडला आहे. या मेहंदी सोहळ्यासाठी शर्मिष्ठा आणि तेजसने हिरव्या रंगाच्या पेहरावाचं कॉम्बिनेशन केलं होतं.
शर्मिष्ठाने सोशल मिडीयावर तिच्या मेहंदी सोहळ्याची झलक पोस्ट केली आहे. या व्हिडीओत शर्मिष्ठा हातावर मेहंदी काढून घेताना दिसतेय. तर दुसरीकडे तेजस शर्मिष्ठासोबत फोटोशूटही करून घेतोय.
शर्मिष्ठा सध्या लग्नाच्या विधींनंतर तिचं चित्रीकरण करत आहे. मात्र विधी करून शर्मिष्ठाला रात्रीचं चित्रीकरण करावं लागतय.
लग्नाच्या विविध विधीनंतर आता शर्मिष्ठा आणि तेजसचा लग्नसोहळा कसा पार पडतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.