By  
on  

गौतमी देशपांडेला झाली पाचवीत ऐकलेल्या या गाण्याची आठवण, नदीकाठी गायलं गाणं

काही गाणी आणि ओळी अशा असतात ज्या कायम स्मरणात असतात. त्या कधी, कुठे ऐकल्या हेही कदाचीत लक्षात नसते पण त्याची आठवण अचानक येते. अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या बाबतीतही असच झालय. गौतमीने इयत्ता पाचवीत ऐकलेलं गाणं अचानक तिच्या स्मरणात आलं. गौतमीला गायनाची प्रचंड आवड आहे. आणि म्हणूनच तिनं नदीकाठी या गाण्याची ओळी गुणगुणल्या. 

'विस्तीर्ण नदीच्या काठी...' या गाण्याच्या ओळी गौतमीने गायल्या आहेत. तिने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. ती या व्हिडीओत लिहीते की, "मला हे गाणं माहिती नाही. मी जेव्हा इयत्ता पाचवीत होते तेव्हा शाळेत ऐकलं होतं. मला फक्त ऐवढचं आठवतय. मला हे शोधण्यासाठी मदत करा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कळवा."

 गौतमीला या गाण्याच्या ओळी स्पष्ट आठवत नसल्याने तिने सोशल मिडीयावर पोस्ट करून या गाण्याविषयी चाहत्यांकडे माहिती मागितली आहे. मात्र या काही ओळी मात्र अतिशय सुरेल गायल्या आहेत. अनेकांना गौतमीचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. गौतमीला या व्हिडीओसाठी हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive