By  
on  

'आई कुठे काय करते'मध्ये आता ईशाला व्हायचंय आईची मैत्रीण

'आई कुठे काय करते' ही मालिका आता प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत येणारी विविधं वळणं आणि मालिकेतील आईचं मुख्य पात्र अरुंधतीच्या आयुष्यात सध्या काय उलथापालथ होत आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. यातच अरुंधतीला अनिरुद्ध आणि संजनाविषयी सगळं कळाय. मात्र अरुंधतीचं वेगळं रुप आता पाहायला मिळतय.

 

एकीकडे दुरावलेली मुलगी ईशाही सगळ्या गोष्टी कळाल्यावर आईच्या जवळ येऊ लागली आहे. ईशा आणि आईचं नातं आता घट्ट होताना दिसतय. एकीकडे संजनाविषयी कौतुक वाटणाऱ्या ईशाला आता तिची चिड येऊ लागली आहे. एवढच नाही तर ईशाला आता आईसोबत मैत्री करण्याची इच्छा होत आहे. आईशी कमी बोलणारी ईशा आता आईसोबत मनमोकळेपणाने बोलू लागली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive