By  
on  

आपल्या हक्काची आपली माणसं असण हाच जगण्यातला सगळ्यात मोठा आधार - भरत जाधव

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता भरत जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेचे टीझरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. भरत जाधव यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

 

या मालिकेविषयी केदार शिंदे आणि भरत जाधव सोशल मिडीयावर विविध पोस्ट करताना दिसतात. नुकतच भरत जाधव यांनी केदार शिंदेंसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "जस जस माणसाचं वय वाढत जातं तस तशी त्याला प्रेमाची किंमत अधिकाधिक कळायला लागते. आणि एका टप्प्यावर लक्षात येतं की आपल्या हक्काची आपली माणसं असण हाच जगण्यातला सगळ्यात मोठा आधार आणि सुख आहे."

आपल्या माणसांचं महत्त्व सांगणारी ही पोस्ट त्यांनी केली आहे. या आगामी मालिकेतही असचं काहीसं पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना आपली वाटेल अशी ही मालिका असेल असं केदार शिंदे यांनी वारंवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive