By  
on  

या कारणासाठी भरत जाधव यांनी 'सही रे सही' नाटक सोडण्याचा घेतला होता निर्णय

भरत जाधव आणि केदार शिंदे ही जोडी आणि 'सही रे सही'चा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. या गाजलेल्या नाटकाची लोकप्रियता आजही तसूभरही कमी झालेली नाही. देशासह परदेशातही या नाटकाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र याच नाटकाशी निगडीत एक किस्सा भरत जाधव यांनी सोशल मिडीयावर शेयर केला आहे. 

'सही रे सही' या नाटकातील गोड गोजिरी या गाण्यावरून भरत आणि केदरा शिंदे यांच्या वाद झाला होता. श्रीमंत दामोदर पंत या नाटकानंतर हे गाणं सही रे सहीमध्येही असण्याची केदार शिंदे यांची इच्छा होती. मात्र या गोष्टीवरून भरत जाधव नाराज झाले होते. त्यानंतर दोघांच्या भांडणानंतर भरतने हे नाटक सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा मित्र अंकुश चौधरीने मध्यस्ती करून त्याच्या सांगण्यावर पहिल्या प्रयोगाला हे गाणं करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हे नाटक आणि हरीची या गाण्यावर टाळ्या शिट्ट्यांवर झालेली एन्ट्री हे नाट्यरसिकांच्या परिचयाचं आहेच. हाच किस्सा भरत जाधव यांनी सविस्तररित्या सोशल मिडीयावर सांगीतला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मी 'सही रे सही' सोडतोय... असं मी १९ वर्षांपूर्वी केदार ला म्हणालो होतो. याला कारण होत 'गोड गोजिरी' गाण. 'श्रीमंत दामोदर पंत' मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं. आणि केदार ची इच्छा होती की 'सही रे सही' मधील हरी या पात्राची एन्ट्री याच गाण्याने व्हावी. आधीच्या नाटकात वापरलेलं गाण पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो. याला कारण होत की आज जरी 'श्रीमंत दामोदर पंत' हे रसिकांच्या पसंतीच नाटक असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं. केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होता. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भांडण झाली आणि मी 'सही रे सही' सोडण्याचा निर्णय घेतला. या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्ठाई केली. आणि एका प्रयोगा पुरत हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरल. १५ ऑगस्ट २००२ ला पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यानी नाट्यगृह दणाणून गेल. आजही या गाण्याला वन्स मोअर रिस्पॉन्स मिळतो.गोड गोजिरी वरील दामुचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीये.आणि 'सही रे सही' चा इतिहास सर्वश्रुत आहे. आज जवळपास ३०-३५ वर्षापासूनची आमची तिघांची मैत्री आहे. जर मी त्या वेळी सही सोडलं असत तर कदाचीत हा सगळा पुढचा प्रवास झालाच नसता. "काही वेळेला आपलं भल आपल्याला कळतं नसत पण आपल्या माणसांना कळतं असतं." याचं विचाराने आपल्या माणसांच्या मनोरंजनासाठी आपली गोष्ट "सुखी माणसाचा सदरा" लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय..! @kedaarshinde @ankushpchaudhari @colorsmarathiofficial #सुखीमाणसाचासदरा

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

 

ते लिहीतात की, "मी 'सही रे सही' सोडतोय...असं मी १९ वर्षांपूर्वी केदार ला म्हणालो होतो. याला कारण होत 'गोड गोजिरी' गाण. 'श्रीमंत दामोदर पंत' मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं. आणि केदार ची इच्छा होती की 'सही रे सही' मधील हरी या पात्राची एन्ट्री याच गाण्याने व्हावी. आधीच्या नाटकात वापरलेलं गाण पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो. याला कारण होत की आज जरी 'श्रीमंत दामोदर पंत' हे रसिकांच्या पसंतीच नाटक असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं.केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होता. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भांडण झाली आणि मी 'सही रे सही' सोडण्याचा निर्णय घेतला. या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्ठाई केली. आणि एका प्रयोगा पुरत हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरल. १५ ऑगस्ट २००२ ला पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यानी नाट्यगृह दणाणून गेल. आजही या गाण्याला वन्स मोअर रिस्पॉन्स मिळतो.गोड गोजिरी वरील दामुचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीये.आणि 'सही रे सही' चा इतिहास सर्वश्रुत आहे.आज जवळपास ३०-३५ वर्षापासूनची आमची तिघांची मैत्री आहे. जर मी त्या वेळी सही सोडलं असत तर कदाचीत हा सगळा पुढचा प्रवास झालाच नसता. "काही वेळेला आपलं भल आपल्याला कळतं नसत पण आपल्या माणसांना कळतं असतं."  याचं विचाराने आपल्या माणसांच्या मनोरंजनासाठी आपली गोष्ट "सुखी माणसाचा सदरा" लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय..!"

मात्र केदार शिंदे आणि भरत जाधव हीच जोडी पुन्हा सुखी माणसाचा सदरा या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा भेटीला येत आहे. याच मालिकेच्या निमित्ताने सध्या भरत आणि केदार हे सोशल मिडीयावर विविध पोस्ट करताना दिसत आहेत. नुकताच या मालिकेचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता.  तेव्हा प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी रंजक पाहायला मिळणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive