By  
on  

मयुरी देशमुखच्या पतिला डिप्रेशनच्या काळात मैत्रिणीने केली होती मदत, वाढदिवसाला केला भावुक व्हिडीओ

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आयुष्यात जुलै महिन्यात दु:खाचा डोंगर कोसळला. मुयरीचा पति आशुतोष भाकरेने आत्महत्या करून स्वत:चं जीवन संपवलं. आशुतोष हा डिप्रेशनमध्ये असल्याचं नंतर समोर आलं. मात्र आशुतोषच्या डिप्रेशनचा काळ मयुरीने जवळून पाहिलेला आहे. या काळात अनेकांची साथ तिला मिळाली होती. यातच तिची मैत्रीण श्वेतानेही तिला आणि आशुतोषला साथ दिली. नुकतच श्वेताच्या वाढदिवसानिमित्ताने मयुरीने एक भावुक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll) on

 

मयुरीने श्वेताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिने आशुतोषच्या डिप्रेशन काळात केलेलं सहाय्य मोलाचं असल्याचं यात सांगीतलं. ती या व्हिडीओत म्हणते की, "आशुला फार एक्सप्रेस करता यायचं नाही. त्यामुळे त्याने तुला सांगीतलं नसेल की तू आयुष्यात असल्याने तो किती कृतज्ञ होता. खासकरून म्हणजे मागील एक वर्षे. तू माझी बेस्ट फ्रेंड असूनही तू त्याला त्याच्या पद्धतिने समजून घेतलस अजीबात जज न करता. आमचा जो काही प्रवास होता डिप्रेशनला समजुन घेण्याचा हा आमचा प्रवास, स्ट्रगल तुझाही होता. तुझ्याशिवाय बरेच टप्पे आम्ही कसे पार केले असते. तू फक्त दुरुन आश्वासन दिलं नाहीस पण आशुतोशचं बोट धरून त्याला बेबी स्टेप घ्यायला लावलस. तू नागपुरहून मुंबईला माझ्यासाठी आशुसाठी बऱ्याचवेळा आली आहेस. मला माहितीय आपल्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. पण त्याचं दु:ख जितकं आम्हाला आहे तितकच तुलाही आहे. तुझ्याकडे पोटतिडकीने मदत करण्याची जी वृत्ती आहे त्याचा आशु आणि मला खूप फायदा झाला आहे. आपल्या या अपयशाने तू हताश होऊ नकोस. तुझ्यासारख्या व्यक्तिंची या जगात खूप गरज आहे."

यासह बऱ्याच गोष्टी मयुरीने या व्हिडीओत शेयर केल्या आहेत. 2016 मध्ये मयुरी आणि आशुतोष विवाहबंधनात अडकले होते. गेल्या काही वर्षांपासून आशुतोष डिप्रेशनशी झुंज देत होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive