By  
on  

दिवाळीत पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार 'विजेता' सिनेमा

केंद्र सरकारने आता देशभरात सिनेमागृहं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तेव्हा येत्या  15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि म्हणूनच या सिनेमागृहांमध्ये काही सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं होतं. सिनेमागृहेही बंद होती. त्यादरम्यान काही रिलीज झालेल्या सिनेमांचे आणि रिलीजच्या वाटेवर असणाऱ्या सिनेमांचेही नुकसान झाले होते. असे काही सिनेमे आता पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यासह काही सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. 

 

अमोल शेटगे दिग्दर्शित 'विजेता' हा मराठी सिनेमाही आता प्रदर्शित करण्यात येत आहे. या सिनेमासोबत शोमॅन सुभाष घई यांचं नाव जोडलं गेल्याने सिनेमाची उत्सुकता वाढली होती. शिवाय सिनेमाचा विषयही वेगळा आहे. मैदानावरील खेळाचा थरार या सिनेमात पाहायला मिळतो. सुबोध भावे, सुशांत शेलार, पूजा सावंत, मानसी कुलकर्णी, प्रीतम कांगणे, सुहास पळशीकर, अजित भुरे, माधव देवचके, दीप्ती धोत्रे, तन्वी परब, देवेन्द्र चौघुले, अनुराधा राजाध्यक्ष, ललित सावंत अशा कलाकारांची फळी या सिनेमात आहे. नुकतच सुभाष घई यांनी हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित होत असल्याची घोषणा ट्विटरवर केली आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र काही दिवसातच लॉकडाउन घोषीत करण्यात आल्याने अनेक प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता आला नाही. तेव्हा येत्या 12 नोव्हेंबरला हा सिनेमात सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात येत आहे.

सुभाष घई त्यांच्या ट्विटमध्ये लिहीतात की, "प्रतिक्षा संपली. पुन्हा सिनेमागृहात बघा स्पोर्ट्सवर आधारित एन्टरटेनिंग फिल्म ज्यात सुबोध भावे, पूजा सावंत आहेत. येत्या 12 नोव्हेंबरला दिवाळीत मोठ्या पडद्यावर महाराष्ट्रात येत आहे. जय भारत जय महाराष्ट्रा"

Author

Recommended

PeepingMoon Exclusive