आपलं स्वत:चं घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. अभिनेता, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवनेही नवं घर घेण्याची इच्छा एक वर्षांपूर्वी पूर्ण केली. नुकतच त्याच्या नवीन घराला एक वर्ष पूर्ण झालं आहेत. याच निमित्ताने प्रियदर्शनने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे.
प्रियदर्शन या पोस्टमध्ये लिहीतो की, "आज नवीन घराला १ वर्ष पूर्ण झालं ! आई , वडील , दादा, बायको, मुलगी , सासू , सासरे , भाऊ , वहिनी, नातेवाईक आणि ( खूप मित्र ! ) केवळ तुमच्यामुळे शक्य झालं. आज सुखी आहे तो तुमच्यामुळेच."
आज नवीन घराला १ वर्ष पूर्ण झालं !
आई , वडील , दादा, बायको, मुलगी , सासू , सासरे , भाऊ , वहिनी, नातेवाईक आणि ( खूप मित्र ! )
केवळ तुमच्यामुळे शक्य झालं.
आज सुखी आहे तो तुमच्यामुळेच ! #आपलीमाणसं pic.twitter.com/OmgPzDlJgF— Priyadarshan Jadhav (@prizadhavv) October 14, 2020
याशिवाय या घरात प्रियदर्शनच्या मुलीसाठीदेखील एक खास खोली त्याने केली आहे. याचा फोटो पोस्ट करून प्रियदर्शन त्याच्या लहानपणीची आठवणही शेयर करतो. तो लिहीतो की, "लहानपणी कोल्हापुरमध्ये असताना घरात दोन्ही मिळालं- स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र विचार.... आई वडिलांनी कष्टाने उभे केलेल्या घरात राहिलो. मुंबईत आल्यावर मुलीसाठी ठरवून वेगळी खोली केली. जे मला मिळालं त्याच्या लखोपटीने तिला मिळावं. इरा मुळे घर खळखळत राहतं."