दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या आगामी ‘पॉंडीचेरी’ सिनेमाची सिनेसृष्टीत बरीच चर्चा सुरु आहे. यासाठी महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे स्मार्टफोनवर चित्रित होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमाचं चित्रीकरण पॉंडीचेरी येथेच पार पडतंय या सिनेमाचं आणखी एक नवं पोस्टर नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करत सिनेमाचं शूटींग रॅप अप झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. या पोस्टरवर अमृता आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी ही जोडी झळकतेय. तर रंजक गोष्ट म्हणजे या दोघांसोबत एक बालकलाकारसुध्दा या पोस्टरवर पाहायला मिळतोय.
यापूर्वी वैभव आणि अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर शेअर केलं होतंं. दूरवर राहणा-या कुटुंबाची गोष्ट, असं या सिनेमाचं कॅप्शन आहे. सई, वैभव आणि अमृता यांच्यासोबतच या सिनेमात अभिनेत्री नीना कुलकर्णी व अभिनेते महेश मांजरेकरसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
https://www.instagram.com/p/BuarBi0h2Bf/?utm_source=ig_share_sheet&igshid=15pse1oiy80lq
तेजस मोडक लिखीत या सिनेमाची निर्मिती निल पटेल यांनी केली आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचे सिनेमे म्हणजे नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळणार यात शंका नाही. सर्वांनाच या मल्टीस्टारकास्ट सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरता लागून राहिली आहे.
https://www.instagram.com/p/BrejZxRFxh6/?utm_source=ig_embed